Marathi News> मनोरंजन
Advertisement

हॅप्पी बर्थ डे मेरे बेस्ट फ्रेंड्स LOL... असं म्हणतं शाहरूखसोबत 'या' खास व्यक्तीला सुहानाने केलं विश

सुहानाने खास अंदाजात केलं शाहरूखला विश 

हॅप्पी बर्थ डे मेरे बेस्ट फ्रेंड्स LOL... असं म्हणतं शाहरूखसोबत 'या' खास व्यक्तीला सुहानाने केलं विश

मुंबई : २ नोव्हेंबर रोजी शाहरूख खानचा वाढदिवस. किंग खानला त्याचे चाहते, सहकलाकार देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहरूख खानची मुलगी सुहाना खानने देखील आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सुहानाच्या आयुष्यात महत्वाच्या असलेल्या आणखी एका व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. सुहानाची अगदी जवळची मैत्रिण शनाया कपूरचा देखील आज वाढदिवस आहे. 

जिथे शाहरूख खान आज आपला ५५ वा वाढदिवस शेअर करत आहे तेथे सुहानाची बेस्टी शनाया कपूर आपला २१ वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहानाने आपल्या इंस्टास्टोरीवर एक थ्रोबॅक ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे. या फोटोत २ नोव्हेंबर २०१९ चा आहे. या फोटोत सुहानासोबत शाहरुख आणि शनाया दिसत आहे. सुहानाने या फोटोत हॅप्पी बर्थ डे मेरे बेस्ट फ्रेंड्स LOL असं म्हटलं आहे. 

fallbacks

मजेदार गोष्ट म्हणजे या पोस्टमध्ये सुहानाने शाहरूखसोबत शनायाचं वय देखील सांगितलं आहे. ५५ आणि २१ हा हा हा हाययय असं लिहून शेअर केलं आहे. शाहरूख आणि सुहानाचा बॉन्ड खूपच छान आहेत. तो या अगोदर देखील दिसला आहे. शनाया देखील तिची चांगली मैत्रिण आहे. बालपणापासून या दोघी एकत्र आहेत. 

Read More